तुमचा तो कळला भाव – संत कर्ममेळासंत कर्ममेळा तुमचा तो कळला भाव – संत कर्ममेळा तुमचा तो कळला भाव । माझा झाला पारखा ठाव ॥१॥ घेवोनी बैसलासी ठेवणें । माझे द्यावें मजकारणें ॥२॥ कायसा करिसी वादावाद । मुळींच खुण्टलासे भेद ॥३॥ कर्ममेळा म्हणे हरि । तुम्हां मज नाहीं उरी ॥४॥ तुमचा तो कळला भाव – संत कर्ममेळा