संतांची संगती आवडे या जीवा – संत कर्ममेळा
संतांची संगती आवडे या जीवा ।
आणिक केशवा दुजें नको ॥१॥
वाया हाव भरी होऊं नेदीं मन ।
राखा आवरोन तुमचें तुम्ही ॥२॥
कर्ममेळा म्हणे पंढरिनिवासा ।
परवावी आशा हीचि माझी ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.