अखंड तें मन ठेवलें चरणीं – संत कर्ममेळा अभंग

अखंड तें मन ठेवलें चरणीं – संत र्ममेळा अभंग


अखंड तें मन ठेवलें चरणीं ।
आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥
गोड गोजिरी विठोबाचीं पाउलें ।
सुखें म्यां ठेविलें मस्तकासी ॥२॥
वायां तोंडपिटी करा कशासाठी ।
तुमची तो रहाटी कळों आली ॥३॥
कर्ममेळा म्हणे लोटांगण पायीं ।
मागणे तें देई हेंचि एक ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अखंड तें मन ठेवलें चरणीं – संत कर्ममेळा अभंग समाप्त.

View Comments

  • मी माझे मन आपल्या चरणाशी वाहिले आहे आणि मी सतत हे ध्यानात ठेवले आहे. विठ्ठलाची गोड गोजिऱ्या पावलांवर मी मस्तक ठेवले आहे. बाकी इतर तोंडपाटिलकी करण्यात व्यर्थ वेळ घालवू नये. विठ्ठल भक्ति पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. मला भक्ति शिवाय इतर काही नको मला हे विठ्ठला आपल्या पायाशी जागा द्यावी हेच एक मागणे आहे. असा अर्थ मला वाटतो. चुकभुल असल्यास क्षमस्व.