आपण वाढवावें आपण बुडवावें – संत कर्ममेळा अभंग

आपण वाढवावें आपण बुडवावें – संत र्ममेळा अभंग


आपण वाढवावें आपण बुडवावें ।
ऐसी रिती बरवें तुमचे घरीं ॥१॥
पाळिल्या पोसिल्या विसर पाडावा ।
समर्थाच्या नांवा लाज येते ॥२॥
रंक मी भिकारी उच्छिष्ठाचा अधिकारी ।
काय भीड हरि माझी तुम्हां ॥३॥
कर्ममेळा म्हणे पंढरीनिवासा ।
उगवा हा फांसा लवकरी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आपण वाढवावें आपण बुडवावें – संत कर्ममेळा अभंग