आणिक वासना नाहीं दुजी मना – संत कर्ममेळा अभंग
आणिक वासना नाहीं दुजी मना ।
संतचरणीं जाणा मस्तक हें ॥१॥
घालीन लोटांगण वंदीन पायधुळी ।
पूर्व कर्मा होळी होय तेणें ॥२॥
नामाची आवडी सर्वकाळ वाचे ।
दुजें साधनचि नेणें कांही ॥३॥
कर्ममेळा म्हणे ही माझी वासना ।
पुरवा नारायणा सर्वभावें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.