आमुच्या बापाचें ठेवणें – संत कर्ममेळा अभंग

आमुच्या बापाचें ठेवणें – संत र्ममेळा अभंग


आमुच्या बापाचें ठेवणें ।
कां तूं न देसी आम्हां कारणें ॥१॥
कैसी तुझी नीत बरी ।
मागतां शिणलों मी हरी ॥२॥
वाउग्या येरझारा ।
किती कराव्या दातारा ॥३॥
कर्ममेळा म्हणे हरी ।
किती मागावें निर्धांरी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आमुच्या बापाचें ठेवणें – संत कर्ममेळा अभंग