योग याग तपे करिता भागली । तीच ही माऊली विटेवरी ।।१।। न येई ध्यानी साधिता साधनी । भक्तासी निर्वाणी धावतसे ।।२।। चारी वेद साही शास्त्रे शिणली । कान्होपात्रा लाधली प्रेमसुखे ।।३।।