विठू दीनांचा दयाळ । वागवी दासाची कळकळ ।।१।। देव कृपावंत मोठा । उणें पडों नेदी तोटा ।।२।। देव भक्तांचा अभिमानी । वाहे चिंता सकळ मनीं ।।३।। देव भावाचा भुकेला । कान्होपात्रा आनंद झाला ।।४।।