वर्म वैरियाचे हाती । देऊ नको श्रीपती ।।१।। तू तो अनाथाचा नाथ । दीन दयाळ कृपावंत ।।२।। वेद पुराणे गर्जती । साही शास्त्रे विवादती ।।३।। चरणी ब्रिद वागविसी । तुझी कान्होपात्रा दासी ।।४।।