सकळही सुरवर येथेंची लाधले । देवचें देखिले चरणांबुज ।। १ ।। हरली ती भूक तहान निमाली । संतांची देखिलीं चरणांबुजें ।।२।। किर्तनाचे रंगी आनंदें नाचतां । कान्होपात्र चित्ता समाधान ।।३।।