पतित तूं पावना – संत कान्होपात्रा अभंग

पतित तूं पावना – संत कान्होपात्रा अभंग


पतित तूं पावना ।
म्हणविसी नारायणा ।। १ ।।
तरी सांभाळीं वचना ।
ब्रीद वागविसी जाणा ।। २ ।।
याती शुद्ध नाही भाव।
दुष्ट आचरण स्वभाव ।।३।।
मुखीं नाम नाहीं ।
कान्होपात्रा शरण पायी ।।४।।


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पतित तूं पावना – संत कान्होपात्रा अभंग

View Comments

  • अभंगांचा अर्थ
    हे देवा तु पतित ,हीन ,दीन लोकांना पवित्र करून त्यांचा उद्धार करतोस असा पतित पावन म्हणून तु स्वतःच स्वतःला म्हणून घेतोस .
    मग आता या उक्तीप्रमाणे वाग.
    तुझे जे ब्रीद आहे ना ,तु पतितपावन आहे याला सांभाळ.खरं करून दाखव.
    मी नीच जातीची, माझा भाव देखील शुद्ध नाही ,वर्तन देखील सज्जनासारखे नाही.
    परंतु तुझे नामस्मरण मी सदैव करत असते,
    नामे दोष जाती म्हणतात .मग माझे दोष दूर करून तुझ्या चरणाशी जागा दे कारण कितीही वाईट असले तरी मी तुला शरण आले आहे.