नामें दोष जळती । नामें पापी उद्धरती ।। १ ।। हें आलें अनुभवा । सत्यजीवा प्रत्यया ।।२।। नामें अपार तारिलें । नामें जीवनमुक्त केले ।।३।। कान्होपात्रा नाम घेतां । पायीं जडली तत्त्वतां ।। ४ ।।