नको देवराया अंत आता पाहू – संत कान्होपात्रा अभंग

नको देवराया अंत आता पाहू – संत कान्होपात्रा अभंग

नको देवराया अंत आता पाहू ।
प्राण हा सर्वथा फुटो पाहे ।।१।।
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले ।
मजलागी जाहले तैसे देवा ।। २ ।।
तुजवीण ठाव न दिसे त्रिभुवनी ।
धावे हो जननी विठाबाई ।।३।।
मोकलोनी आस जाहले उदास ।
घेई कान्होपात्रेस हृदयात ।।४।।

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नको देवराया अंत आता पाहू – संत कान्होपात्रा अभंग

View Comments