माझे माहेर पंढरी – संत कान्होपात्रा अभंग
माझे माहेर पंढरी ।
सुखे नांदू भीमातीरी ।।१।।
येथे आहे मायबाप ।
हरे ताप दरुशने ।।२।।
निवारिली तळमळ चिंता ।
गेली व्यथा अंतरीची ।।३।।
केशी विटेवरी शोभली ।
पाहुनी कान्होपात्रा धाली ।।४।।
माझे माहेर पंढरी ।
सुखे नांदू भीमातीरी ।।१।।
येथे आहे मायबाप ।
हरे ताप दरुशने ।।२।।
निवारिली तळमळ चिंता ।
गेली व्यथा अंतरीची ।।३।।
केशी विटेवरी शोभली ।
पाहुनी कान्होपात्रा धाली ।।४।।