घ्या रे घ्या मुखी नाम । अंतरी धरोनिया प्रेम ।।१।। माझा आहे भोळा बाप । घेतो ताप हरोनि ।।२।। आपुलिया नामासाठी । धावे संकटी लवलाहे ।।३।। घ्यारे घ्यारे अनुभव । कान्होपात्रेचा माधव ।।४।।