दीन पतित अन्यायी – संत कान्होपात्रा अभंग

दीन पतित अन्यायी – संत कान्होपात्रा अभंग


दीन पतित अन्यायी ।
शरण आले विठाबाई ।। १ ।।
मी तो आहे यातीहीन ।
न कळे काही आचरण ।। २ ।।
मज अधिकार नाही ।
शरण आले विठाबाई ।। ३ ।।
ठाव देई चरणापाशी |
तुझी कान्होपात्रा दासी ।।४।।


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दीन पतित अन्यायी – संत कान्होपात्रा अभंग

View Comments

  • कान्होपात्रा ही एका वेश्येची मुलगी होती त्यामुळे ती. स्वतःला यातीहीन म्हणवून घेते. संत चोखामेळा महार होता. त्याने कान्होपात्रेला गुरुमंत्र दिला. त्यामुळे तीसुद्धा देवभक्त झाली. परंपरेने मिळालेला व्यवसाय तिने केला नाही. ती चालत पंढरपूर पर्यंत गेली. विठ्ठलाच्या मंदिरा पर्यंत गेली. तिला अभंग सुचले. ते गाऊन तिने विठ्ठलाची आराधना केली. या अभंगात ती म्हणते की देवा मी तुला शरण आले आहे.