अंबऋषीसाठी । जन्म घेतलें जगजेठी ।। १ ।। वागदी भक्तांचा आभार । ऋणी झाला निरंतर ।। २ ।। अर्जुनाचे रथीं बैसे । त्याचे घोडे धुतसे ।।३।। लाज सांडी ऋषीकेषी । कान्होपात्रा तुझी दासी ।।४।।