अगावैकुंठींच्या राया । अगा विठ्ठल सखया ।।१।। अगानारायणा । अगा वसुदेवनंदना ।।२।। अगापुंडलीक वरदा । अगा विष्णु तूं गोविंदा ।।३।। अगारखुमाईच्या कांता । कान्होपात्रा राखी आतां ।।४।।