न गमे न गमे न गमे हरिविण । न गमे न गमे न गमे मेळवा शाम कोणी गे ॥१॥ तळमळ करी तैसा जीव जळाविण मासा । दिसती दिशा वोसा वो ॥२॥ नाठवे भूक तान विकळ जाले मन । घडी जाय प्रमाण जुगा एकी वा ॥३॥ जरी तुम्ही नोळखा सांगतों ऐका । तुकयाबंधुचा सखा जगजीवन वो ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.