अनंतजन्में जरी केल्या तपराशी । तरी हा न पवसी म्हणे देह ॥१॥ ऐसें जें निधान लागलेंसे हातीं । त्याची केली माती भाग्यहीना ॥२॥ उत्तमाचें सार वेदांचें भांडार । ज्याच्यानें पवित्र तीर्थें होतीं ॥३॥ म्हणे तुकयाबंधु आणिक उपमा । नाहीं या तों जन्मा द्यावयासी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.