पत्र उचटिलें प्रयत्नें । ग्वाही कराया कारणें । नाहीं तरी पुण्यें । तुझ्या काय उणें आम्हां ॥१॥ नांव तुझेंचि करोनी । आहों सुखें पोट भरोनी । केली केली जाणवणी । म्हणउनि नाहीं म्हणसील ॥२॥ आतां इतुकियाउपरी । दे नको भलतें करीं । म्हणती ऋणकरी । आमुचा इतकें उदंड ॥३॥ तुकयाबंधु जागा । आळवावया पांडुरंगा । केला कांहीं मागा । याची नव्हती गरज ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.