तोचि प्रसंग आला सहज । गुज धरिता नव्हे काज । न संडितां लाज । पुढें वोज न दिसे ॥१॥ तूं तर न होसी शहाणा । नये सांगतों तेंही मना । आपण आपणा । आतां प्रयत्न देखावा ॥२॥ न पुरवी पाहातां वाट । द्यावें प्रमाण चोखट । कांस घालुनियां नीट । चौघाचार करावा ॥३॥ आतां श्रमाचें कारण । नव्हे व्हावें उदासीन । न पडे तयावीण । गांठी तुकयाबंधु म्हणे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.