असो आतां कांहीं करोनियां – संत कान्होबा अभंग – ३संत कान्होबा राय असो आतां कांहीं करोनियां – संत कान्होबा अभंग – ३ असो आतां कांहीं करोनियां ग्लांती । कोणा काकुलती येईल येथें ॥१॥ करुं कांहीं दिस राहे तो सायास । झोंबों त्या लागास भावाचिये ॥२॥ करितां रुदना बापुडें म्हणती । परि नये अंतीं कामा कोणी ॥३॥ तुकायबंधु म्हणे पडिलिया वनीं । विचार तो मनीं बोलिला हे ॥४॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. असो आतां कांहीं करोनियां – संत कान्होबा अभंग – ३