Skip to content
असो आतां कांहीं करोनियां – संत कान्होबा अभंग – ३
असो आतां कांहीं करोनियां ग्लांती ।
कोणा काकुलती येईल येथें ॥१॥
करुं कांहीं दिस राहे तो सायास ।
झोंबों त्या लागास भावाचिये ॥२॥
करितां रुदना बापुडें म्हणती ।
परि नये अंतीं कामा कोणी ॥३॥
तुकायबंधु म्हणे पडिलिया वनीं ।
विचार तो मनीं बोलिला हे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
असो आतां कांहीं करोनियां – संत कान्होबा अभंग – ३