आतां न राहे क्षण एक । तुझा कळला र लौकिक । नेदी हालों एक एक । कांहीं केल्यावांचुनी ॥१॥ संबंध पडिला कोणाशीं । काय डोळे झांकितोसी । नेईन पांचांपाशी । दे नाहीं तरी वोढूनी ॥२॥ सुखें नेदीस जाणवलें । नास कल्याविण उगलें । तरी तेंही विचारिलें । आम्ही नांवा वांचूनि दुजा नाइकों ॥३॥ सर्वगुणें सपन्न । कळों आलासी संपूर्ण । तुकयाबंधु म्हणे चरण । आतां जीवें न सोडी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.