मागें असतासी कळला । उमस घेऊं नसता दिला । तेणेंचि काळें केला । असता अवघा निवाडा ॥१॥ इतका न लागला उशीर । न धरितों भीडभार । सिद्धासी व्यवहार । कासयसी लागला ॥२॥ असोनियां माल खरा । किती केल्या येरझारा । धरणेंहि दिवस तेरा । माझ्या भावें घेतलें ॥३॥ अझुन तरी इतक्यावरी । चुकवी जनाचार हरी । तुकयाबंधु म्हणे उरी । नाहीं तरी नुरे कांहीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.