सख्यत्वासी गेलों करीत – संत कान्होबा अभंग – २

सख्यत्वासी गेलों करीत – संत कान्होबा राय अभंग – २


सख्यत्वासी गेलों करीत सलगी ।
नेणेंचि अभागी महिमा तुझा ॥१॥
पावलों आपुलें केलें लाहें रस ।
निदैवा परिस काय होय ॥२॥
कष्टविलासी म्यां चांडाळें संसारीं ।
अद्यापवरी तरी उपदेशीं ॥३॥
उचित अनुचित सांभाळिलें नाहीं ।
कान्हा म्हणे कांई बोलों आतां ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सख्यत्वासी गेलों करीत – संत कान्होबा अभंग – २