सख्यत्वासी गेलों करीत – संत कान्होबा अभंग – २संत कान्होबा राय सख्यत्वासी गेलों करीत – संत कान्होबा राय अभंग – २ सख्यत्वासी गेलों करीत सलगी । नेणेंचि अभागी महिमा तुझा ॥१॥ पावलों आपुलें केलें लाहें रस । निदैवा परिस काय होय ॥२॥ कष्टविलासी म्यां चांडाळें संसारीं । अद्यापवरी तरी उपदेशीं ॥३॥ उचित अनुचित सांभाळिलें नाहीं । कान्हा म्हणे कांई बोलों आतां ॥४॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. सख्यत्वासी गेलों करीत – संत कान्होबा अभंग – २