तुझीं वर्में आम्हां ठावीं – संत कान्होबा अभंग – १३
तुझीं वर्में आम्हां ठावीं – संत कान्होबा अभंग – १३
तुझीं वर्में आम्हां ठावीं नारायणा ।
परि तूं शाहाणा होत नाहीं ॥१॥
मग कालावुली हाका देते वेळे ।
होतोसी परी डोळे नुघडिसी ॥२॥
जाणोनी अज्ञान करावें मोहरें ।
खोटी खोडी हे रे तुझी देवा ॥३॥
तुकयाबंधु म्हणे कारण प्रचीती ।
पाहतां वेळ किती तेच गुण ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
तुझीं वर्में आम्हां ठावीं – संत कान्होबा अभंग – १३