तुझीं वर्में आम्हां ठावीं – संत कान्होबा अभंग – १३
तुझीं वर्में आम्हां ठावीं नारायणा । परि तूं शाहाणा होत नाहीं ॥१॥ मग कालावुली हाका देते वेळे । होतोसी परी डोळे नुघडिसी ॥२॥ जाणोनी अज्ञान करावें मोहरें । खोटी खोडी हे रे तुझी देवा ॥३॥ तुकयाबंधु म्हणे कारण प्रचीती । पाहतां वेळ किती तेच गुण ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
तुझीं वर्में आम्हां ठावीं – संत कान्होबा अभंग – १३