धींदधींद तुझ्या करीन चिंधड्या । ऐसें काम वेड्या जाणितलें ॥१॥ केली तरी बरें मज भेटी भावास । नाहीं तरी नास आरंभिला ॥२॥ मरावें मारावें या आलें प्रसंगा । बरें पांडुरंगा कळलें सावें ॥३॥ तुकयाबंधु म्हणे तुझी माझी उरी । उडाली न धरीं भांड कांहीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.