भक्ति मुक्ति तुझें जळो ब्रह्मज्ञान । दे माझ्या आणोन भावा वेगीं ॥१॥ रिद्धि सिद्धि मोक्ष ठेवीं गुंडाळून । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥२॥ नको आपुलिया नेऊं वैकुंठासी । दे माझ्या भावासी आणून वेगीं ॥३॥ नको होऊं काहीं होसील प्रसन्न । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥४॥ तुकयाबंधु म्हणे पाहा तो नाहीं तरी । हत्या होईल शिरीं पांडुरंगा ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.