लालुचाईसाठीं बळकाविसी – संत कान्होबा अभंग – १०

लालुचाईसाठीं बळकाविसी – संत कान्होबा अभंग – १०

लालुचाईसाठीं बळकाविसी भावा ।
परि मी जाण देवा जिरों नेदीं ॥१॥
असों द्या निश्चय हा मनीं मानसीं ।
घातली येविशीं दृढ कास ॥२॥
मज आहे बळ आळीचें सबळ ।
फोडीन अंतराळ हृदय तुझें ॥३॥
करुणारसें तुकयाबंधु म्हणे भुलवीना ।
काढून घेईना निज वस्तु ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

लालुचाईसाठीं बळकाविसी – संत कान्होबा अभंग – १०