दुःखें दुभांगलें हृदयसंपुष्ट – संत कान्होबा अभंग – १

दुःखें दुभांगलें हृदयसंपुष्ट – संत कान्होबा अभंग – १-


दुःखें दुभांगलें हृदयसंपुष्ट ।
गहिवरें कंठ दाटताहे ॥१॥
ऐसें काय केलें सुमित्रा सखया ।
दिलें टकोनियां वनामाजी ॥२॥
आक्रंदती बाळें करुणावचनीं ।
त्या शोकें मेदिनी फुटों पाहे ॥३॥
काय हें सामर्थ्य नव्हते तुजपाशीं ।
संगें न्यावयासी अंगभूतां ॥४॥
तुज ठावें आम्हां कोणी नाहीं सखा ।
उभयलोकीं तुका तुजविण ॥५॥
कान्हा म्हणे तुझ्या वियोगें पोरटीं ।
जालों दे रे भेटी बंधुराया ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दुःखें दुभांगलें हृदयसंपुष्ट – संत कान्होबा अभंग – १