लाभोनी हा जन्म मंत्रे कां फसावें ।
आंतचि रिघावें शरण गुरुसी ॥१॥
त्यजुनि शास्त्र शंका मान महत्व लज ।
वराव पुन्हा राजयोगीमंत्र ॥२॥
देववावा आधईं कांतेसी मग स्वयें ।
घ्यावा संप्रदाय उपदेश ॥३॥
करो नये विचार जरी आड येती ।
वाळवेही पती माता पिता ॥४॥
बुड्विती स्वहित तेचि साच वैरी ।
नेती यमपुरी पुर्वजेंसी ॥५॥
खोवाव कां तारुं अक्षय ब्रह्मदाता ।
जन्मीचेया कांता पती सर्व ॥६॥
झाले जे अनन्य राजयोगीयांसी ।
नलगे तयासी करणें योग ॥७॥
होवोनि जीवें दासी राजयोगीयाची ।
पावावें पद तें ची तयासंगे ॥८॥
नाहीं भरंवसा आयुष्य बुडबुडा ।
नाशायां बापुडा मग म्हणे ॥९॥
सांगे गुरु तेंचि करावें सर्व देहें ।
हें करी नोहे हें म्हणे नये ॥१०॥
गात्र शक्ती तारुण्य इंद्रिये जंव तंव ।
व्हावे देहें देव नोहे मग ॥११॥
म्हणे जनार्दन सदुरुपायी लोटी ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१२॥
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.