हेचि गुह्मा ज्ञान सांगितलें मज – संत जनार्दन स्वामी अभंग – १७
हेचि गुह्मा ज्ञान सांगितलें मज ।
तेणे मी सहज मीची झालों ॥१॥
हेचि मत्स्येंदासी ज्ञान आदिनाथें ।
कथिलें निवृत्तीनाथें ज्ञानदेवा ॥२॥
तेथुनी हें संती रुढली परंपरा ।
आदिनाथ गुरु संप्रदायीं ॥३॥
सोळा अभंगाचा लिहुनी प्रबंध ।
गोदा तटी सिद्ध संत मेळी ॥४॥
उद्धाराया विश्वा धाडिला पैठणीं ।
उरलें याहोनी नाहीं आतां ॥५॥
येथुनी उपदेश झाला सांग पूर्ण ।
तारक हे ज्ञान सेवो विश्व ॥६॥
म्हणे जनार्दन वचन बांधी गांठीं ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥७॥
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
हेचि गुह्मा ज्ञान सांगितलें मज – संत जनार्दन स्वामी अभंग – १७