बोधावें सकळां गुरु – संत जनार्दन स्वामी अभंग – १५

बोधावें सकळां गुरु – संत जनार्दन स्वामी अभंग – १५


बोधावें सकळां गुरु प्रेममरें ।
वर्णोनि चरित्रें श्रीगुरुचीं ॥१॥
फिरुनी स्त्रियां नरां विनवावेंसलगी ॥
स्वामीसेवें लागीं अभय दानां ॥२॥
शिबिका न्हाणी गाणीं विंजणे ।
चौफळा करावे मंगळ जयजयकारे ॥३॥
सुवासिनी करेंकुंकुम आरत्या ।
रव्या ब्रह्मादात्या सहस्त्र नित्य ॥४॥
कडुनि सहस्त्र विप्रा तुळसी विल्व पुष्पें ।
अर्पावें साक्षेपें नित्य नेमें ॥५॥

तांबुल विलास भोग वेळों वेळां ।
भोगावावा सोहळा श्रीतारका ॥६॥
पदार्थ शर्करा नवनीत दुग्ध ।
अर्पावा नैवेद्य क्षणोक्षणी ॥७॥
नेमें नित्य तीर्थें प्रसादे पावन ।
करावें विश्व संपुर्ण श्रीगुरुच्या ॥८॥
नसे गुरुवीण तीर्थ देव ब्रह्मा ।
नेणोनि मुढ वर्म शिणती वायां ॥९॥
म्हणे जनार्दन खुणेची गुज गोष्टी ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१०॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

बोधावें सकळां गुरु – संत जनार्दन स्वामी अभंग – १५