आले श्रीगुरुनाथ अथवा – संत जनार्दन स्वामी अभंग – ११

आले श्रीगुरुनाथ अथवा – संत जनार्दन स्वामी अभंग – ११


आले श्रीगुरुनाथ अथवा येती ळे ।
व्हावें उतावीळ जावें तेथे ॥१॥
आणावे सेवावें सर्वस्वे निरंतर ।
तरीचशिष्य येर जाती नरका ॥२॥
असो कांही काज हर्ष का संकट ।
समय प्राणांत होवो कांहीं ॥३॥
देवो कोणी ताप जावो देह प्राण ।
उडवो शीर आण शपथ वाहो ॥४॥
जावो देवो नये तारकासी कंही ।
पडो ब्रह्मांडही कोसळोनि ॥५॥

घाडलिया होय सर्वस्वाची बुड ।
पुरवावे कोड सर्व कांही ॥६॥
विकावे देहें धरुं नये लाज ।
साधावें निजकाज याचि देहें ॥७॥
घेवोनि शपथ होवोनि निर्भय ।
वरावे अक्षय तारकासी ॥८॥
दिधले देवें गात्र शक्ति हें वैभव ।
मन बुद्धी सर्व अंतरबाह्म ॥९॥
न मिळे न जन्म ऐसा हा पुढती ।
खोविल्या मागुती कांही केल्या ॥१०॥

नेमें नित्य निशी साठ घटीं आत ।
साधावे निजहित झटी एक ॥११॥
नसेचि सुलभ राजयोगा ऐसें ।
याचि देहीं दिसे देव डोळां ॥१२॥
एकांती अभ्यास निकट गुरुक्षेत्री ।
करावा बसोनि घरीं करु नये ॥१३॥
पुरुषें पत्‍नीसह करावा अभ्यास ।
घ्यावा उपदेश उमयतां ॥१४॥
आकारिली वस्तु रुपें स्त्रीपुरुष ।
एकचि प्रत्यक्ष मासे दोन ॥१५॥

म्हणोनि श्रौत स्मार्त योगयाग सर्व ।
करावें सर्वथैव पत्‍नीसह ॥१६॥
मोगोनि विलास साधावा राजयोग ।
हटी तो निहर्ग वसे वनी ॥१७॥
असोनिया पत्नी करोनये एकाकी ।
नेदावे कवतिकी तारकेही ॥१८॥
वदो नये निमित्त काम धंदा आळस ।
निर्वाहाचे मीष सच्छिष्येंही ॥१९॥
सेवनी प्रेमें सुखें राहोनी संसारी ।
व्हावे स्वयें हरी आपेंआप ॥२०॥
म्हणे जनार्दन साठवावा संपुटी ।
उघडी भ्रमताटीएकनाथ ॥२१॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

आले श्रीगुरुनाथ अथवा – संत जनार्दन स्वामी अभंग – ११