भेटला अवचित भाग्यें राजयोगी ।
पुसावे तयालागी सकळी प्रेमें ॥१॥
अथवा पडे कणी योगी हे आवांका ।
आणावे शिबिका गजरेशी ॥२॥
द्यावे अपार घन वस्त्रें अलंकार ।
पदार्थें उपचार राजभोग ॥३॥
देवो नये क्लेश दुःखद ते भोग ।
जेणे होय मंग संतोषासी ॥४॥
नेमें घ्यावें वर्षे द्वादश ठेवोनि ।
प्रेमे विनवोनि सकळीं नित्य ॥५॥
करों देवों नये श्रम योगियासी ।
आद्य हे देवासी वद्ययोगी ॥६॥
आवदे जें तेंचि पुरवावे सर्व ।
देवाचाही देव योगी ब्रह्मा ॥७॥
करावी सकळ योगियाचि सेवा ।
तेणे श्रीकेशवा तोष होये ॥८॥
सहज राजयोगी झालिया प्रसन्न ।
मिटे जन्म मरण भवबंध ॥९॥
येवोनिया योगी झालिया अव्हेर ।
तेणे सर्वेश्वर होय दुःखी ॥१०॥
न करविती शरण स्त्रियापुत्रादिका ।
जाती ते नरका कल्पवरी ॥११॥
अंतरविती योगी भेटोनि श्रीराम ।
दंडी म्हणुनी यम आत्मवैरी ॥१२॥
फिरोनि सकळां विनवावें सप्रेम ।
वर्णोंनि महात्म्य योगियांचे ॥१३॥
नेमें नारी नरा करवावें शरण ।
तेणें वाढे पुण्य फळ कृपा ॥१४॥
न करितां न सधे आत्मसहित ।
अंतरे अनंत नलमे कही ॥१५॥
अनन्य शरण झाले योगियासी ।
घडले सर्व त्यासी केल्यावीण ॥१६॥
झाली दग्ध पापें कोटी अगणीत ।
जोडले पर्वत पुण्याचे ते ॥१७॥
योगयाग सर्व तयासी घडले ।
कुळें उद्धरिलें बेताळीस ॥१८॥
झाले हरि हर वश तोचि मुक्त ।
करोनि आलिप्त पापपुण्यें ॥१९॥
योगी यांची सेवा करी ब्रह्मा स्वयें ।
भोगोनि ऐश्वर्य देहे गेहें ॥२०॥
नामें उपासना कमें तपें घोर ।
होती चमत्कार थोर जनीं ॥२१॥
देतां ताप देहा होती प्राप्त सिद्धि ।
परी ते उपाधी क्षणीकची ॥२२॥
न तरती त्रिशुद्धी तेणें आपणची ।
येरां उघ्घाराची मात कैची ॥२३॥
अक्षय निजसिघ्घी योगेंचि पं प्राप्त ।
व्हावें ब्रह्मीं मुक्त देहेंचि तें ॥२४॥
म्हणोनि शरण व्हावें उपेदशिकें आधीं ।
होवोनि पूर्ण बोधी तारावें जना ॥२५॥
म्हणे जनार्दन तरले असंख्य कोटी ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥२६॥
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.