वैष्णव तो कबीर चोखामेळा – संत जनाबाई अभंग – ९७
वैष्णव तो कबीर चोखामेळा महार ।
तिजा तो चांभार रोहिदास ॥१॥
सजण कसाई बाया तो कसाब ।
वैष्णव तो शुद्ध एकनिष्ठ ॥२॥
कमाल फुलार मुकुंद जोहरी ।
जिहीं देवद्वारीं वस्ति केली ॥३॥
राजाई गोणाई आणि तो नामदेव ।
वैष्णवांचा राव म्हणवितसे ॥४॥
त्या वैष्णवाचरणीं करी ओंवाळणी ।
तेथें दासी जनी शरीराची ॥५॥