Categories: जनाबाई

भक्तामाजीं अग्रगणी – संत जनाबाई अभंग – ९२

भक्तामाजीं अग्रगणी – संत जनाबाई अभंग – ९२


भक्तामाजीं अग्रगणी ।
पुंडलिक महामुनी ॥१॥
त्याचे प्रसादें तरले ।
साधुसंत उद्धरिलें ॥२॥
तोचि प्रसाद आम्हासीं ।
विटेवरी ह्रुषिकेषि ॥३॥
पुंडलिक बापमाय ।
दासी जनी वंदी पाय ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भक्तामाजीं अग्रगणी – संत जनाबाई अभंग – ९२