या वैष्णवाच्या माता । तो नेणवें देवा दैतां ॥१॥ तिहीं कर्म हें पुसिलें । अकर्म समूळ नाहीं केलें ॥२॥ कानाचे हे कान । झालें धरुनियां ध्यान ॥३॥ डोळियाचा डोळा । करुनी धाले प्रेम सोहळा ॥४॥ तोही वश्य नरदेहीं । जनी दासी वंदी पायीं ॥५॥