माझें दुःख नाशी देवा – संत जनाबाई अभंग – ८५
माझें दुःख नाशी देवा ।
मज सुख दे केशवा ॥१॥
आह्मां सुख ऐसें देई ।
तुझी कृपा विठाबाई ॥२॥
चरणीं अनन्य शरण ।
त्यासि नाहीं जन्म मरण ॥३॥
जनी म्हणे हेंचि मागें ।
धण्या सर्व तुज सांगें ॥४॥
माझें दुःख नाशी देवा ।
मज सुख दे केशवा ॥१॥
आह्मां सुख ऐसें देई ।
तुझी कृपा विठाबाई ॥२॥
चरणीं अनन्य शरण ।
त्यासि नाहीं जन्म मरण ॥३॥
जनी म्हणे हेंचि मागें ।
धण्या सर्व तुज सांगें ॥४॥