ऐसा पुत्र देंई संतां । तरी त्या आवडी पंढरिनाथा ॥१॥ गीता नित्य नेमें । वाची ज्ञानेश्वरी प्रेमें ॥२॥ संतांच्या चरणा । करी मस्तक ठेंगणा ॥३॥ कन्या व्हावी भागीरथी । तुझे प्रेम जिचे चित्तीं ॥४॥ ऐसे करी संतजना । दासी जनीच्या निधाना ॥५॥