देवा देंई गर्भवास । तरीच पुरेल माझी आस ॥१॥ परि हे देखारे पंडरीं । सेवा नामयाचे द्वारीं ॥२॥ करी पक्षि कां शुकर । श्वान श्वापद मार्जार ॥३॥ ऐसी आशा हे मानसीं । म्हणे नामयाची दासी ॥४॥