विटेवरी ब्रह्म दिस – संत जनाबाई अभंग – ८२जनाबाई विटेवरी ब्रह्म दिस – संत जनाबाई अभंग – ८२ विटेवरी ब्रह्म दिस । साधु संतांचा रहिवास ॥१॥ देव भावाचा अंकित । जाणे दासाचें तें चित्त ॥२॥ भक्ति जनी मागे देवा । तिचा मनोरथ पुरवा ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. विटेवरी ब्रह्म दिस – संत जनाबाई अभंग – ८२