साळी सडायास काढी । पुढें जाउनी उखळ झाडी ॥१॥ कांडितां कांडितां । शीण आला पंढरिनाथा ॥२॥ सर्व अंगीं घाम आला । तेणें पितांबर भिजला ॥३॥ पायीं पैंजण हातीं कडीं । कोंडा पांखडूनि काढी ॥४॥ हाता आला असे फोड । जनी ह्मणे मुसळ सोड ॥५॥