जनींचें बोलणें वाची नित्य कोणी । तयाचे आंगणीं तिष्ठतसे ॥१॥ जनीचिया पदां आखंडित गाये । तयाचे मी पाये वंदी माथां ॥२॥ जनीचे आवडे जयासी वचन । तयासी नारायण कृपा करी ॥३॥ पांडुरंग म्हणे ऐक ज्ञानदेवा । ऐसा वर द्यावा जनीसाठीं ॥४॥