वेदांतीं हें बोलिले । सिद्धांतीं हें नेमियेले ॥१॥ लागा लागा भक्तिवाटा । धरा हेंचि नेमनिष्ठा ॥२॥ वेदबाह्य तें कर्म । सांडीं न करीं अधर्म ॥३॥ तोचि एक होय ज्ञानी । देवनिष्ठ म्हणे जनी ॥४॥