प्रेमभावें तुह्मी नाचा । रामरंगें रंगो वाचा ॥१॥ हेंचि मागों देवाजीला । आवडी शांती खरें बोला ॥२॥ जैसी माय तान्हयातें । खेळउनी चुंबी त्यातें ॥३॥ तेंवि तुह्मी संतजना । सर्वी धरावी भावना ॥४॥ हरि कोठवळा झाला । म्हणे जनी भक्तीं केला ॥५॥